Sunday, March 02, 2025 01:49:22 AM

IMF Prediction On Indian Economy: '2047 पर्यंत भारत बनू शकतो विकसित देश'; IMF ची मोठी भविष्यवाणी

'भारत 2047 पर्यंत विकसित देश बनू शकतो,' अशी भविष्यवाणी IMF ने केली आहे. 2025-26 मध्येही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील, असे आयएमएफने स्पष्टपणे म्हटले आहे.

imf prediction on indian economy 2047 पर्यंत भारत बनू शकतो विकसित देश imf ची मोठी भविष्यवाणी
IMF Prediction On Indian Economy
Edited Image

IMF Prediction On Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेची जगभरात सतत चर्चा सुरू असते. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) जे भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात मोठं भाकीत केलं आहे. खर तर ही संपूर्ण भारतीयांसाठी खूपचं चांगली बातमी आहे. कारण, 'भारत 2047 पर्यंत विकसित देश बनू शकतो,' अशी भविष्यवाणी IMF ने केली आहे. 2025-26 मध्येही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील, असे आयएमएफने स्पष्टपणे म्हटले आहे. तथापी, देशाचा जीडीपी 6.5 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. 

IMF ने भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात विश्वास का व्यक्त केला?

आयएमएफच्या मते, भारताच्या अर्थव्यवस्थेत ज्या प्रकारच्या सुधारणा होत आहेत त्यामुळे भविष्यात त्याला आणखी बळकटी मिळेल. याशिवाय, सरकारकडून करण्यात येत असलेल्या संरचनात्मक सुधारणांमुळे देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल. आयएमएफचा असा विश्वास आहे की, भारताची मजबूत धोरणे, गुंतवणूक आणि सतत सुधारणारी अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर भारताला पुढे ठेवेल.

हेही वाचा - India's Q3 GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुधारली! तिसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर 6.2 टक्क्यांवर पोहोचला

वास्तविक जीडीपी 6.5 टक्के दराने वाढेल - IMF 

दरम्यान, आयएमएफने असा अंदाज लावला आहे की, 2024-25 आणि 2025-26 मध्ये देशाचा वास्तविक जीडीपी 6.5 टक्के दराने वाढेल. ही वाढ मजबूत खाजगी वापर आणि आर्थिक स्थिरतेवर आधारित असेल. भारत सरकारच्या मते, पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था त्याच वेगाने वाढू शकते. तथापी, येत्या काळात अन्नधान्य महागाई कमी होण्याची शक्यता आहे आणि मुख्य चलनवाढ त्याच्या निर्धारित लक्ष्याजवळ राहील, असेही आयएमएफने म्हटले आहे. यामुळे आर्थिक संतुलन आणखी मजबूत होईल.

हेही वाचा - टॉप 24 सुपर अब्जाधीशांच्या यादीत अंबानी-अदानीचा समावेश; कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? जाणून घ्या

IMF ने भारताला दिल्या खास सूचना - 

चांगल्या रोजगार संधी: आयएमएफचा असा विश्वास आहे की, भारताने चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढेल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल.

खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन: खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारला धोरणे अधिक स्थिर आणि सोपी करावी लागतील.

महिला कामगार सहभाग: आयएमएफने असे सुचवले आहे की, कामगार बाजारपेठेत महिलांचा सहभाग वाढवल्याने आर्थिक विकासाला चालना मिळू शकते.

थेट परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन: परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व्यापार आणि प्रशासनात सुधारणा केल्या पाहिजेत. 

व्यवसाय सुलभता: देशात व्यवसाय अधिक सुलभ करण्यासाठी, कर आणि धोरणांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. 

2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल का?

भारताने आर्थिक सुधारणांची गती कायम ठेवली तर 2047 पर्यंत देश एक प्रगत अर्थव्यवस्था बनू शकते, असा आयएमएफचा विश्वास आहे. यासाठी, भारताने कामगार सुधारणा, शिक्षण सुधारणे आणि महिला कामगारांचा सहभाग वाढवणे, पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचं IMF ने नमूद केलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री