Wednesday, April 02, 2025 02:18:04 PM

Delhi Election Results 2025: आपच्या प्रचारात इंडिया आघाडीच्या नेत्यांची पाठ

आम आदमी पक्षाच्या 12 वर्षांच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला. भाजपाने दिल्लीत विजयश्री खेचून आणताना काँग्रेसला पूर्णतः सत्तेपासून दूर ठेवलं. काँग्रेस आणि आपमधील विसंवादाचाच भाजपाला फायदा झाला आहे.

delhi election results 2025 आपच्या प्रचारात इंडिया आघाडीच्या नेत्यांची पाठ

दिल्ली: आम आदमी पक्षाच्या 12 वर्षांच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला. भाजपाने दिल्लीत विजयश्री खेचून आणताना काँग्रेसला पूर्णतः सत्तेपासून दूर ठेवलं. काँग्रेस आणि आपमधील विसंवादाचाच भाजपाला फायदा झाला आहे. केजरीवाल यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांना तुरूंगवारी करावी लागली, अशा अनेक मुद्यांवर आपचा पराभव झालाय. दिल्लीकरांना त्यांना हव्या असलेल्या सोयी-सुविधा देवूनही दिल्लीकरांनी आपच्या पारड्यात मतांचे दान टाकले नाही. आपच्या पराभवाची प्रमुख कारणे पाहूयात..

हेही वाचा: जरांगेचं पुन्हा साखळी उपोषण

आपच्या पराभवाचं कारणं कोणती?
1.दिल्लीतील कथित मद्य घोटाळा 'आप'ला महागात पडल्याची चर्चा
2.सर्व घोटाळ्याचे मुद्दे निवडणुकीत प्रभावीपणे वापरण्यात भाजपा यशस्वी
3.INDIA आघाडीचे नेते प्रचारात कुठेच दिसले नाहीत
4.शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादवांनी 'आप'ला पाठिंबा दिला होता
5.मात्र 'आप'च्या प्रचाराला इंडिया आघाडीतील कोणताही दिग्गज नव्हता
6.काँग्रेससोबत केजरीवालांनी आघाडी न केल्याचा फटका देखील फटका
7.भाजपचं सूक्ष्म नियोजन, केंद्रीय मंत्री, सर्व राज्याचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले
8.भाजपानं ज्या भाषिकांची जास्त लोकवस्ती त्या ठिकाणी त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा घेतल्या
9.मुस्लिम बहुल इलाक्यात विश्वास निर्माण करण्यात भाजप यशस्वी
10.आपचं दलित मुस्लिम प्रेम फक्त कागदावरच राहिलं
11.प्रत्यक्षात मुस्लिमांसाठी आपनं काहीच केल्यानं फटका बसला 

हेही वाचा: Delhi Election Results 2025: आपच्या पराभवाची कारणं कोणती?

केजरीवाल यांचा राजकीय प्रवेश खऱ्या अर्थानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून झाला. आंदोलनानंतर अण्णांची मर्जी विरोधात केजरीवाल यांनी राजकीय पक्षाची स्थापना केल्यामुळे अण्णा हजारे आणि केजरीवाल यांचे संबंध कमालीचे दुरावले होते. आपचा उदय दिल्लीतून झाला आणि आता आपचा अस्तही दिल्लीतून होईल,  अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याचे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आपच्या पराभवानंतर अण्णा हजारे यांनीही केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

दिल्लीत आपची सत्ता असताना त्यांनी दिल्लीकरांना वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवलं, मात्र, दिल्लीतील माफियांवर नियंत्रण मिळवण्यात आपला अपयश आलं. या निवडणुकीत प्रमुख्यानं काँग्रेससोबत न जाण्याचा घेतलेला निर्णय आपला भोवला असून मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फटका बसला आहे. भाजपाने निवडणुकीसाठी ठरवलेली रणनिती शत प्रतिशत प्रत्यक्षात उतरली आहे.


 


सम्बन्धित सामग्री