Saturday, October 05, 2024 11:59:12 PM

PM Narendra Modi
'विकासशत्रू मविआमुळे मेट्रोच्या खर्चात वाढ'

विकासशत्रू मविआमुळे मेट्रो ३ प्रकल्पाच्या खर्चात १४ हजार कोटी रुपयांची वाढ झाली, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी केला.

विकासशत्रू मविआमुळे मेट्रोच्या खर्चात वाढ

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात पंतप्रधान मोदी यांनी ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ितर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विकासाला विरोध करणाऱ्या मविआवर कडाडून टीका केली. विकासशत्रू मविआमुळे मेट्रो ३ प्रकल्पाच्या खर्चात १४ हजार कोटी रुपयांची वाढ झाली, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी केला. 

मेट्रोमुळे मुंबई, ठाण्याला नवी ओळख मिळाली आहे. मविआ सरकारने अनेक कामांना स्थगिती दिली. पण महायुती सरकारने सत्तेत येताच विविध विकासकामांना गती दिली. यामुळे राज्याची वेगाने प्रगती सुरू आहे. देशात काँग्रेस हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. या पक्षाने घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला प्राधान्य दिल्यामुळे जनतेचे नुकसान झाले. महायुतीने जनहिताला प्राधान्य दिल्यामुळे राज्याची प्रगती होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष आहे. भ्रष्टाचाराला प्राधान्य देणारी काँग्रेस विकासाची शत्रू असल्याचेही मोदी म्हणाले. अलिकडेच काँग्रेसचे समर्थक झालेले आता त्यांच्या सूरात सूर मिसळून बोलत आहेत. ते वक्फ सुधारणा विधेयक, कलम ३७० हटवण्याचा निर्णय याला विरोध करत आहेत. काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते त्यावेळी काँग्रेसचे नवसमर्थक मूग गिळून गप्प बसतात. या अशा देशहितविरोधी, विकासशत्रूंना पाठिंबा द्यायचा की विकासाला गती देणाऱ्या महायुतीला साथ द्यायची याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे आणि विकासकामांकरिता केंद्राकडून सहकार्य देण्यासाठी पंतप्रधान मोदींचे जाहीर आभार मानले. 

पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण तर पोहरादेवीत नगारा भवनाचं उद्घाटन

'मविआनं अहंकारातून मेट्रोचं काम थांबवलं'
'अडीच वर्ष काम थांबल्यानं मेट्रोचा खर्च १४ हजार कोटींनी वाढला'
पंतप्रधान मोदींची तत्कालीन मविआ सरकारवर टीका

'मविआ सरकारनं अनेक कामात खोडा घातला'
'कुणाचं तरी गर्वहरण करणारी ही मेट्रो ३'
शिंदे आणि फडणवीसांचा मविआसह उद्धव यांना टोला

'नेहरुंनी शिवरायांचं अपमान करणारं पुस्तक लिहिलं'
'राहुल यांनी आधी माफी मागावी, मग शिवरायांचं नाव घ्यावं'
फडणवीसांचं राहुल यांच्यावर टीकास्त्र


सम्बन्धित सामग्री