Asia Longest Hyperloop Tube
Edited Image
Asia Longest Hyperloop Tube: देशातील वाहतूक आता फक्त सामान्य रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गापुरती मर्यादित राहिलेली नाही. भारतात आता वंदे भारत सारख्या जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांसह सेमी-हायस्पीड ट्रेन्स आणि नमो भारत सारख्या जलद ट्रेन्स देखील सुरू झाल्या आहेत. एवढेच नाही तर मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन देखील चालवली जाणार आहे, ज्याचे काम सध्या सुरू आहे. पण, भारताची वाहतूक फक्त इथेच थांबणार नाही. भारतात हायपरलूपची चाचणी घेतली जात आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच आयआयटी मद्रास येथील हायपरलूप चाचणी प्रकल्पाला भेट दिली.
हायपरलूप ट्यूब लांबी -
दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, 'आयआयटी मद्रास येथील 410 मीटर लांबीची हायपरलूप टेस्ट ट्यूब ही आशियातील सर्वात लांब हायपरलूप टेस्टिंग सुविधा आहे आणि लवकरच ती जगातील सर्वात लांब हायपरलूप टेस्ट ट्यूब असेल.' 2013 मध्ये एलोन मस्कने पहिल्यांदा संपूर्ण जगाला हायपरलूप दाखवले. हायपरलूप तंत्रज्ञान ही एक हाय-स्पीड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे जी व्हॅक्यूम-सील केलेल्या ट्यूबमध्ये 1000 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने पॉड्स चालवू शकते.
हेही वाचा - Deepseek नंतर, चीनने नवीन AI Assistant Manus केले लाँच; काय आहे याची खासियत? जाणून घ्या
अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला हायपरलूप ट्यूबचा व्हिडिओ -
तथापि, केंद्रीय मंत्र्यांनी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे हायपरलूपसाठी इलेक्ट्रॉनिक घटक विकसित करण्याची योजना देखील उघड केली. अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आयआयटी मद्रासमध्ये केलेल्या हायपरलूपच्या लाईव्ह डेमोचा व्हिडिओ देखील शेअर केला.
हेही वाचा - Urban Company Launch Insta Maid Service: काय सांगता! आता फक्त 15 मिनिटांत तुमच्या घरी पोहोचणार मोलकरीण; अर्बन कंपनीने सुरू केली 'इंस्टा मेड्स' सेवा
हायपरलूप तंत्रज्ञानाच्या विकासासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी -
तथापि, रेल्वे मंत्रालयाने मे 2022 मध्ये, हायपरलूप तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासासाठी आयआयटी मद्रासला 8.34 कोटी रुपये वाटप केले होते. हायपरलूप ट्रान्सपोर्टसाठी ही संपूर्ण चाचणी प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी हायपरलूप प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.