Sunday, June 30, 2024 08:56:02 AM

T20 World Cup
विश्वचषकाची उपांत्य फेरी गुरुवारपासून

वीस - वीस षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी भारतीय वेळेनुसार गुरुवार २७ जूनपासून सुरू होत आहे.

विश्वचषकाची उपांत्य फेरी गुरुवारपासून

त्रिनिदाद : वीस - वीस षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी भारतीय वेळेनुसार गुरुवार २७ जूनपासून सुरू होत आहे. उपांत्य फेरीत भारत, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चार संघांनी प्रवेश केला आहे. गुरुवारी पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात टक्कर होईल. दोन्ही उपांत्य सामन्यांचे विजेते शनिवार २९ जून रोजी अंतिम सामन्यात खेळतील. 

भारतीय वेळेनुसार वेळापत्रक

  1. गुरुवार २७ जून २०२४ - पहिला उपांत्य सामना - दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान - लारा स्टेडियम, तारौबा, त्रिनिदाद - सकाळी ६ वाजता
  2. गुरुवार २७ जून २०२४ - दुसरा उपांत्य सामना - भारत विरुद्ध इंग्लंड - प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना - रात्री ८ वाजता
  3. शनिवार २९ जून २०२४ अंतिम सामना -प. उ. सा. विजेता विरुद्ध दु. उ. सा. विजेता - केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस - रात्री ८ वाजता

सम्बन्धित सामग्री