Tuesday, January 07, 2025 11:28:21 AM

I can also become Chief Minister - Narahari Jirwal
मी मुख्यमंत्री पण होऊ शकतो- नरहरी झिरवाळ

अनेक नेते मंडळींचे वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात परंतु आता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी शिरवाळ यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

 मी मुख्यमंत्री पण होऊ शकतो- नरहरी झिरवाळ

अनेक नेते मंडळींचे वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात परंतु आता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी शिरवाळ यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. 'मी २८८ जणांचं सभागृह चालवू शकतो तर मी मुख्यमंत्री पण होऊ शकतो.', असं वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. 

काय म्हणाले नरहरी झिरवाळ? 
'मी २८८ जणांचं सभागृह चालवू शकतो तर मी मुख्यमंत्री पण होऊ शकतो.', असं वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी शिरवाळ यांनी केले आहे. कल्याणमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले असून ते चर्चेत आले आहेत. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले की, 'आदिवासी विकास मंत्री व्हावं मात्र माझं म्हणणं होतं की, मी आदिवासी आहे म्हणून आदिवासी मंत्री होऊ का? मी कोणतंही मंत्रिपद सांभाळू शकतो.', असं देखील त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर 'महायुतीच्या नेत्यांनी मला अन्न औषध प्रशासन विभागाचे मंत्रिपद दिलं. या खात्यात खूप आव्हान आहेत. कारण मनुष्यबळ कमी आहेत. साधनं नाहीत. राज्यात टेस्टिंग लॅब तीनच आहेत त्यांची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून मी विनोदाने म्हटलं की मी २९९ चं सभागृह चालवले. तर मी राज्य चालवू शकतो. सगळी खाती जनतेसाठी निर्माण केलेली आहेत. हे खातं पण मला मुख्यमंत्री पदासारखंच वाटत आहे.' असे देखील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. 


सम्बन्धित सामग्री