नवी मुंबई : हवामान खात्याने मंगळवार ९ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा इशारा मिळाल्यानंतर ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आणि नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी शाळांना मंगळवारी सुटी जाहीर केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी महत्त्वाचे काम नसल्यास घरी राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे.