Sunday, March 02, 2025 07:58:39 PM

'छोट्या हिटमॅन'चे नाव ठरले अहान, काय आहेअहानचा अर्थ ?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. १५ नोव्हेंबरला रितिकाने गोंडस मुलाला जन्म दिला. दुसऱ्यांदा बाब

छोट्या हिटमॅनचे नाव ठरले अहान
काय आहेअहानचा अर्थ

मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. १५ नोव्हेंबरला रितिकाने गोंडस मुलाला जन्म दिला. दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता रोहित शर्मा आणि रितिकाने आपल्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या बाळाचे नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे. 

रितिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवर एक फोटो शेअर करत आपल्या मुलाच्या नावाची घोषणा केली. डिसेंबर महिन्याला सुरूवात झाली असून या महिन्यामध्ये नाताळ सणदेखील असतो. या महिन्याच्या पहिल्याच तारखेला रितिकाने आपल्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. रितीकाने ख्रिसमसच्या (Christmas) थीमवर आधारित फॅमिलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ४ जण दिसत आहेत. यावर रितिकाने आपल्या सर्व फॅमिली मेंबरची नावं लिहिली आहे. या माध्यमातून तिने आपल्या मुलाचं नाव जाहीर केले आहे. यामध्ये रोहितचा रो, रितीकाचा रित्स, मुलगी समायराचं सॅमी आणि मुलाचं नाव अहान (Ahaan) असं लिहिल्याचे दिसत आहे. या इन्स्टा स्टोरीसोबत रितीकाने ख्रिसमिस हा हॅशटग वापरला आहे. तसंच या फोटोवर डिसेंबर लिहून लव्ह इमोजी पोस्ट केला आहे.

अहानचा अर्थ काय होतो?

अहान हे नाव संस्कृत शब्दावरून आले आहे. ज्याचा अर्थ खूपच शक्तिशाली आहे. अहान हा शब्द संस्कृतीच्या अहा या शब्दापासून आला आहे. या शब्दाचा अर्थ जागृत करणे असा होता. या नावाची लोकं नेहमी शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. या शब्दाचा समानार्थी शब्द पाहिला तर तो प्रकाश, जागृती आणि चेतनेचा पहिला करण असा होतो. 


सम्बन्धित सामग्री