कल्याण : मराठी माणूस जागा हो.. असं आपण नेहमीच एकाला असेल याचाच काहीसा प्रत्यय कल्याणमधून समोर आलाय. कल्याण येथील योगीधाम परिसरामध्ये अखिलेश शुक्ला या एमटीडीसी मध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने दहा ते पंधरा गुंडांच्या मदतीने मराठी कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ योगीधाम परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
कल्याणच्या अजमेरा हाईट्समध्ये राहणारे अखिलेश शुक्ला यांचा धूप लावण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला. या वादातून त्याने दहा ते पंधरा जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. अखिलेश शुक्ला या अधिकाऱ्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होता होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून शुक्ला याने बाहेरून दहा ते पंधरा जणाना बोलावून घेतले. सोसायटीतील लोकांना माराहाण केली.
या हल्ल्यात विजय कल्वीकट्टे, अभिजीत देशमुख, धीरज देशमुख हे जखमी झाले आहे. या प्रकरणी खकडपाडा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे मराठी लोकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.