बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप होताय. त्यातच आता अजून एक मोठी अपडेट समोर आलीय. बीड पोलीस दलात उलथापालथ झाली असून चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याय. यामुळे हे प्रकरण आणखी कुठलं नवीन वळण घेताय कि काय अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
याबाबत सविस्तर
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये केजचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक वैभव पाटील हे आता केज पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
पोलिस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार घेणार आहेत. तर पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.