Saturday, October 05, 2024 04:01:05 PM

Election
हरियाणात शनिवारी मतदान

हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे.

हरियाणात शनिवारी मतदान

चंदिगड : हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी १०३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. 

हरियाणात एकूण दोन कोटी तीन लाख ५४ हजार ३५० पात्र मतदार आहेत. राज्यात एक लाख ४९ हजार १४२ पात्र दिव्यांग मतदार आहेत. मतदानासाठी हरियाणात २० हजार ६३२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजपा सत्ता राखण्यासाठी तर काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे दोन्ही पक्ष सत्तेत येण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. 

याआधी जम्मू काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी १८ सप्टेंबर रोजी ६१.३८ टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबर रोजी २६ जागांसाठी ५७.३१ टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात ४० जागांसाठी १ ऑक्टोबर रोजी ६९.६५ टक्के मतदान झाले. राज्यात एकूण ६१.३८ टक्के मतदान झाले.


सम्बन्धित सामग्री