पुणे : हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सोडून शरद पवारांच्या राशपमध्ये प्रवेश केला. इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी राशप प्रमुख शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह अनेक नेते उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राशपमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशामुळे राशपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देण्यास काही नेत्यांनी विरोध केला आहे. 'सोनाई'चे संचालक प्रवीण माने यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा लवकरच पुढील निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.