जळगाव : जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले. ते खास करून राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेना व राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणावर बोलत होते.
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना काय म्हणाले : गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदावर बोलताना सांगितले की, "नेमक्या काय चर्चा सुरू आहेत, ते आमच्या हातातले निर्णय नाहीत. महायुतीची बैठक होईल आणि त्यात निर्णय घेतला जाईल." त्यांनी शिंदे यांच्या भूमिकेचा आदर करत, यापुढे येणाऱ्या निर्णयांमध्ये भाजपा आणि शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
राष्ट्रवादीमुळे शिवसेनेच्या जागा कमी झाल्या : गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत भाष्य करत, "अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. पण, त्यावेळी आम्ही विरोध केला नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो, आणि त्यावेळी आम्ही भाजपला मदत केली."
पाटलांची संजय राऊतवर टीका : गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. "संजय राऊत याच्या अंगातच भानुमती आली आहे. ते सडलेले डोक्स आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या बद्दल बोलणे योग्य नाही. त्याच्याशी संबंधित जळगाव जिल्ह्यात पाच पैकी एकही जागा निवडून आणू शकले नाही," असेही पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व : पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वावर बोलताना, "शिंदे साहेबांची दाढीवर हात फिरवण्याची सवय आहे. ते संतापले की दाढीवर हात फिरवतात आणि आनंदी असले की ते अजून तसेच वागतात. त्यांचा मूड आम्ही त्यांच्या दाढीवरून ओळखत असतो. गुलाबराव पाटील यांच्या या ताज्या वक्तव्यांनी राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. .