Tuesday, June 25, 2024 12:32:40 PM

ISIS Terrorists
आयसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने अहमदाबाद विमानतळावर कारवाई केली. या कारवाईत आयसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली

आयसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक

अहमदाबाद, २० मे २०२४, प्रतिनिधी : गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने अहमदाबाद विमानतळावर कारवाई केली. या कारवाईत आयसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे रहिवासी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. 

गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीआधारे सापळा रचून दहशतवाद्यांना पकडल्याची माहिती गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने प्रसारमाध्यमांना दिली आहे. दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

देशात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आहे. या वातावरणात दहशतवाद्यांना अटक झाल्यामुळे संभाव्य घातपात टळला आहे. 


सम्बन्धित सामग्री