Tuesday, February 25, 2025 06:27:52 PM

Govinda Divorce
लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट? मराठी अभिनेत्री ठरली सोशल मीडियावरील चर्चेला कारण

सध्या सोशल मीडियावर गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा लग्नानंतर 37 वर्षांनी वेगळे होणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यांच्यातील दुरावा निर्माण होण्याचे कारण एक मराठी अभिनेत्री बनली आहे.

लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट मराठी अभिनेत्री ठरली सोशल मीडियावरील चर्चेला कारण
Govinda with Wife Sunita
Edited Image

Govinda Divorce: बॉलिवूडचा मनोरंजनाचा बादशहा गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी त्याचे कारण कोणताही सुपरहिट चित्रपट नसून त्याच्या वैवाहिक आयुष्यातील वादळ आहे. सध्या सोशल मीडियावर गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा लग्नानंतर 37 वर्षांनी वेगळे होणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यांच्यातील दुरावा निर्माण होण्याचे कारण एक मराठी अभिनेत्री बनली आहे, अशीही चर्चा आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. 

गोविंदा आणि सुनीताच्या नात्यात दुरावा?  

गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न 1987 मध्ये झाले होते. हे दोघे दोन मुलांचे पालक आहेत. गोविंदा आणि सुनीताची जोडी इंडस्ट्रीमध्ये नेहमीचं एक आदर्श जोडी मानली जाते. पण आता त्यांच्या नात्यात दुरावा वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. गोविंदाचे इतर अभिनेत्रींसोबत अफेर असल्याच्या अफवा यापूर्वीही पसरल्या होत्या, परंतु प्रत्येक वेळी दोघांनी मिळून यावर स्पष्टीकरण दिलं होतं. 

हेही वाचा - घटस्फोटानंतर क्रिकेटपटू युजवेंद्र देणार धनश्रीला 'इतकी' पोटगी. वाचून व्हाल थक्क

गोविंदाची मराठी अभिनेत्रीशी जवळीक?  

गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात यापूर्वीही अनेकदा चढ-उतार आले आहेत, पण प्रत्येक वेळी दोघांनीही त्यांचे नाते वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हे प्रकरण अधिक गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. गोविंदाची एका मराठी अभिनेत्रीशी वाढत्या जवळीकतेमुळे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे. तथापि, दोघांपैकी कोणीही अद्याप यावर अधिकृत विधान केलेले नाही. गोविंदाने स्वतः एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याला नीलम खूप आवडते आणि तो तिच्याशी लग्नही करू इच्छित होता. त्याने असेही म्हटले की, जर सुनीताने त्याला परत बोलावले नसते तर त्याने कदाचित नीलमशी लग्न केले असते. 

हेही वाचा - छावा’ चित्रपट वादात, शिर्के वंशजांचा आक्षेप – दिग्दर्शकाने मागितली माफी

दरम्यान, ही बातमी सोशल मीडियावर पसरताच चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने लिहिले, “आता मला समजले की गोविंदाला का गोळी मारण्यात आली!” तर दुसऱ्याने विनोद करत म्हटले, "नीलमने हो म्हटले आहे असे दिसते!" दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, "कदाचित गंगेत स्नान न करण्याचा हा परिणाम असावा."
 


सम्बन्धित सामग्री