Monday, September 16, 2024 01:53:19 PM

Metro
आनंदाची बातमी, मेट्रोचे तिकीट झाले स्वस्त

सिडकोने बेलापूर ते पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रोच्या तिकिटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला

आनंदाची बातमी मेट्रोचे तिकीट झाले स्वस्त

बेलापूर : जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱ्या नवी मुंबई मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा, यासाठी सिडकोने बेलापूर ते पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रोच्या तिकिटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतलाय. शनिवार पासून मेट्रोचे किमान दर १० रुपये तर कमाल ३० रुपये असणार आहेत. नवी मुंबईतील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेलापूर ते पेंधर मार्गावरील मेट्रोच्या तिकिटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंतची कपात केल्याने सुधारित तिकीट दरांनुसार बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता तिकिटाचा दर आता ३० रुपये असणार आहे. नवी मुंबई मेट्रोच्या सुधारित दरानुसार पहिल्या २ आणि २ ते ४ किलोमीटरसाठी १० रुपये तसेच पुढील ४ ते ६ आणि ६ ते ८ किलोमीटरकरिता २० रुपये तर ८ ते १० टप्प्यासह त्यापुढील अंतराकरिता ३० रुपये तिकीट दर असणार आहेत.

बेलापूर ते पेंधर मार्गावरील मेट्रोच्या तिकिटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत कपात, सिडको प्रशासनाचा निर्णय
मेट्रोचे किमान दर १० रुपये तर कमाल ३० रुपये असणार 


सम्बन्धित सामग्री