Sunday, December 22, 2024 04:31:04 PM

Western Railway Passengers
पश्चिम रेल्वे प्रवाशांना आनंदाची बातमी

पश्चिम रेल्वे मार्गावर मालाड आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेची रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चाचणी केल्यानंतर प्रतितास ९५ कि.मी. वेगाने रेल्वे चालविण्यास परवानगी दिली आहे.

पश्चिम रेल्वे प्रवाशांना आनंदाची बातमी

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर मालाड आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेची रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चाचणी केल्यानंतर प्रतितास ९५ कि.मी. वेगाने रेल्वे चालविण्यास परवानगी दिली आहे. पाचव्या मार्गिकेवर चालविण्यात येणाऱ्या सर्व डाऊन लोकल सहाव्या मार्गिकेवर वळविण्यात येतील. त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या कांदिवली मालाडदरम्यान ४.५ किमीच्या नव्या मार्गिकेवर चाचणी करण्यासाठी  प्रतितास १२३ च्या वेगाने रेल्वे चालवली. सोमवारी या मार्गावरील चाचणी पूर्ण करण्यात आली. यासंदर्भात काही सूचना केल्या असून त्यांची पूर्तता पुढच्या १५ दिवसांत करण्याचे आदेश दिले आहेत. 

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री







jaimaharashtranews-logo