ठाणे : सीमा हैदर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. फेसबुकवरुन झालेल्या ओळखीनंतर भारत सोडून थेट पाकिस्तानमधील अॅबोटाबाद येथे गेलेल्या ठाण्याच्या तरुणीने निकाह गेला. काही काळ पाकिस्तानमध्ये मुक्काम केल्यानंतर ही तरुणी मायदेशी परतली. हा प्रकार कळताच ठाणे पोलिसांनी तरुणीला लगेच चौकशीसाठी बोलावले. तरुणीची पोलीस चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील तरुणी पाकिस्तानमधील अॅबोटाबाद येथे गेली. निकाह केला. नंतर काही काळ रावळपिंडी येथे वास्तव्यास होती. यानंतर १७ जुलै रोजी तरुणी भारतात परतली. रावळपिंडी येथे पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्यालय आहे. तर अॅबोटाबाद येथे काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन लपून बसला होता. अमेरिकेने कारवाई करुन लादेनला ठार केले होते. यामुळे पाकिस्तान जाऊन राहिलेल्या तरुणीची पोलीस कसून चौकशी करत आहेत.