Tuesday, April 08, 2025 01:20:51 PM

घणसोली क्रीडा संकुलामुळे शहराच्या वैभवात भर पडणार

विभागीय क्रीडा संकुलाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मुंबईसह एमएमआर विभागातील क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

घणसोली क्रीडा संकुलामुळे शहराच्या वैभवात भर पडणार


 नवी मुंबई : विभागीय क्रीडा संकुलाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मुंबईसह एमएमआर विभागातील क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईमध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारच्या खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार असून, ते उभे राहिल्यास यामुळे नवी मुंबईच्या वैभवामध्येही भर पडणार आहे. पुण्यातील बालेवाडीच्या धर्तीवर नवी मुंबईमध्ये भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासनाने घणसोली सेक्टर १२, १२ ए व १३ मध्ये ७८ एकर भूखंड आरक्षित केला होता. यापैकी ४२ एकर विभागीय क्रीडा संकुल व ३६ एकर पालिकेच्या क्रीडा संकुलासाठी आरक्षित केला होता. परंतु, सिडकोने विभागीय संकुलाच्या जागेवर निवासी इमारतीसाठी भूखंड वितरित केल्याने व शासनाने ते रायगड जिल्ह्यातील माणगावला स्थलांतरित केल्यामुळे क्रीडाप्रेमींची निराशा झाली होती. परंतु, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टने न्यायालयात धाव घेतल्याने व न्यायालयानेही शासनाला कडक शब्दात आदेश दिल्यामुळे आता पुन्हा ते होण्याची आशा निर्माण झाली आहे.


सम्बन्धित सामग्री