मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मीरा रोड - भाईंदर जागा महत्त्वाची आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष तिकडे आहे. मीरा भाईंदर विधानसभेची जागा भाजपा लढवणार असल्याची चिन्हे आहेत. भाजपामधून माजी आमदार नरेंद्र मेहता व गीता जैन यांच्यामध्ये रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळते आहे. दोन्ही उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. गीता जैन यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला. विद्यमान आमदार म्हणून गीता जैन यांना भाजपकडून संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.