Sunday, August 25, 2024 11:55:30 AM

Gauri Lankesh
गौरी लंकेश हत्या, ३ जणांना जामीन

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाने  जामीन दिला.

गौरी लंकेश हत्या ३ जणांना जामीन

बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाने  जामीन दिला. न्यायमूर्ती  एस. विश्वजित शेट्टी यांनी अमित दिगवेकर, केटी नवीन कुमार आणि एचएल सुरेश यांना जामीन मंजूर केला.

गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हत्या झाली होती. कार्यालयातून घरी परतलेल्या गौरी लंकेश घराचे कुलुप काढत होत्या, त्यावेळी मारेकऱ्यांनी जवळून गोळीबार करुन त्यांची हत्या केली. मारेकरी दुचाकीवरुन आले होते आणि त्यांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते. यामुळे मारेकऱ्यांना शोधणे पोलिसांना कठीण झाले होते. प्रदीर्घ तपासाअंती पोलिसांनी तीन जणांना मारेकरी असल्याचा आरोप ठेवून अटक केले. या तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाने जामीन दिला.     


सम्बन्धित सामग्री