Sunday, September 08, 2024 07:23:30 AM

Fresh status of reservoir today
जलाशयाची आजची ताजी स्थिती

मुंबई शहराला महानगरपालिकेकडून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतके पाणी पुरवले जाते. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांची आजची ताजी स्थिती.

जलाशयाची आजची ताजी स्थिती
Dam

मुंबई :  मुंबई शहराला महानगरपालिकेकडून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतके पाणी पुरवले जाते. तर पाणीसाठा २ हजार २०० दशलक्ष लिटर इतका आहे. मागील वर्षी सर्व धरणांमध्ये या वेळेला ५०.१८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. या वर्षीही ७६८,८७४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा २३ जुलै २०२४ रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार आहे. 

जलशयांची नावे : 
१) भातसा जलाशय 
२)अपर वैतरणा जलाशय 
३) मध्य वैतरणा जलाशय 
४) मोडकसागर जलाशय 
५) तानसा जलाशय 
६) तुळशी जलाशय 
७) विहार जलाशय 

१) भातसा जलाशय 

एकूण पाणी साठवण क्षमता - ७१७,०३७ दशलक्ष लिटर 
सध्या पाणी साठवण - ३७३,३६१ दशलक्ष लिटर 

२)अपर वैतरणा जलाशय 

एकूण पाणी साठवण क्षमता - २२७, ०४७ दशलक्ष लिटर 
सध्या पाणी साठवण - ४१, ८३७ दशलक्ष लिटर 

३) मध्य वैतरणा जलाशय 

एकूण पाणी साठवण क्षमता - १९३,५३० दशलक्ष लिटर 
सध्या पाणी साठवण  - ९१,०१५ दशलक्ष लिटर 

४) मोडकसागर जलाशय 

एकूण पाणी साठवण क्षमता  - १२८,९२५  दशलक्ष लिटर 
सध्या पाणी साठवण  - ९७, २८७  दशलक्ष लिटर 

५) तानसा जलाशय 

एकूण पाणी साठवण क्षमता  - १४५,०८० दशलक्ष लिटर  
सध्या पाणी साठवण  - १३२,८१५ दशलक्ष लिटर 

६) तुळशी जलाशय 

एकूण पाणी साठवण क्षमता  - ८,०४६ दशलक्ष लिटर  
सध्या पाणी साठवण - ८,०४६ दशलक्ष लिटर 
पूर्ण 

७) विहार जलाशय 

एकूण पाणी साठवण क्षमता - २७,६९८ 
सध्या पाणी साठवण - २४,४८५ 

जुलै महिन्याला सुरूवात होताच मुंबई उपनगरात मुसळधार पावसाला सुरू झाली. मुंबईत जुलैमध्ये झालेल्या पावसाने जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जलाशयांच्या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


 


सम्बन्धित सामग्री