Wednesday, September 18, 2024 02:18:15 AM

Manipur
मणिपूरमधील पाच जिल्ह्यात पाच दिवस इंटरनेट बंद

इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि कक्चिंग जिल्ह्यांच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात लीज लाइन्स, व्हीएसएटी, ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा पाच दिवसांसाठी बंद

मणिपूरमधील पाच जिल्ह्यात पाच दिवस इंटरनेट बंद

इंफाळ : इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि कक्चिंग जिल्ह्यांच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात लीज लाइन्स, व्हीएसएटी, ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय मणिपूर सरकारने घेतला आहे. आधी इंटरनेट बंदी संपूर्ण मणिपूरमध्ये होती. काही तासांनी या आदेशात बदल करण्यात आला. कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये कुकींनी हिंदू मैतेईंच्या वस्तीला लक्ष्य करुन रॉकेट हल्ला केला होता. हमासचे अतिरेकी करतात तशा पद्धतीचा रॉकेट हल्ला कुकींनी हिंदू मैतेईंच्या नागरी वस्तीवर केला. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. हिंसा थांबवण्यासाठी मणिपूरच्या अनेक भागांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अफवांना आळा घालण्यासाठी राज्यातील निवडक भागांमध्ये इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री