रायगड : नाताळच्या सुट्टीत किल्ले रायगडला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे. सध्या रायगड किल्ला पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. यामध्ये शिवभक्तांप्रमाणे शैक्षणिक सहली देखील रायगडवर येत आहेत. केवळ लहान मुलं किंवा तरुणच नव्हे तर रायगडला भेट देणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध नागरिकांचाही समावेश आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत किल्ल्याची खडानखडा माहिती घेत आहेत. स्वराज्याच्या राजधानीवरील इतिहासाच्या खुणा पाहत पर्यटक धन्य होत आहेत. छत्रपतींचा जयजयकार करीत दररोज हजारो पर्यटक सध्या रायगडला भेट देत आहेत.
हेही वाचा : वाशिममध्ये नाताळचा उत्साह
जय भवानी जय शिवाजीच्या उद्घोषणांनी किल्ले रायगड दुमदुमला आहे. किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. शिवप्रेमींबरोबरच शैक्षणिक सहलीही रायगडावर आल्या आहेत.