Thursday, September 19, 2024 10:57:30 PM

Buddhadeb Bhattacharjee
माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

ज्येष्ठ डावे (कम्युनिस्ट / साम्यवादी) नेते आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे दक्षिण कोलकाता येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

कोलकाता : ज्येष्ठ डावे (कम्युनिस्ट / साम्यवादी) नेते आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे दक्षिण कोलकाता येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

भट्टाचार्य यांच्या पश्चात पत्नी मीरा आणि मुलगा सुचेतन असा परिवार आहे. बुद्धदेव भट्टाचार्य हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे पॉलिट ब्युरोचे माजी सदस्य होते. ते २००० ते २०११ या कालावधीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ज्योती बसू यांच्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य प्रदीर्घ काळ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ममता बॅनर्जी यांनी डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता मोडीत काढली आणि विधानसभेची निवडणूक जिंकली. यानंतर हळू हळू भट्टाचार्य हे राजकारणात मागे पडले. 

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यासाठी ओळखले जाणारे बुद्धदेव भट्टाचार्य अनेक वर्ष चार खोल्यांच्या घरातून पश्चिम बंगालवर नियंत्रण ठेवत होते. त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या पदांवर चांगली कामगिरी केली. आमदार, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशी सर्व पदे त्यांनी भूषवली. 


सम्बन्धित सामग्री