Thursday, September 12, 2024 06:03:53 PM

S Padmanabhan
चेन्नईत माजी लष्करप्रमुखांचे निधन

भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचे चेन्नई येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

चेन्नईत माजी लष्करप्रमुखांचे निधन

चेन्नई : भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचे चेन्नई येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांनी ४३ वर्ष लष्कराच्या माध्यमातून देशसेवा केली. लष्करातून ते ३१ डिसेंबर २००२ रोजी निवृत्त झाले. 

जनरल सुंदरराजन पद्मनाभन हे भारताचे विसावे लष्करप्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यां विरुद्ध यशस्वी संघर्ष केला होता. लष्करप्रमुख होण्याआधी सुंदरराजन पद्मनाभन यांनी उत्तर आणि दक्षिण या दोन्ही विभागांसाठी जीओसी हे पद सांभाळले होते. जनरल पद्मनाभन सप्टेंबर २००० ते डिसेंबर २००२ या काळात भारताचे लष्करप्रमुख होते. त्यांचा जन्म तिरुअनंतपुरम येथे झाला. राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे येथे शिक्षण घेऊन त्यांनी लष्करात महत्त्वाची पदे भूषवली. ते १९९३ ते १९९५ या काळात जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढणाऱ्या पंधराव्या कॉर्प्सचे कमांडर होते. 


सम्बन्धित सामग्री