दरभंगा : विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख बिहार सरकारचे माजी मंत्री मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी यांची हत्या झाली. घरातच त्यांना ठार करण्यात आले. जीतन साहनी यांच्या शरीरावर चाकूने हल्ला केल्यामुळे झालेल्या जखमा दिसत आहेत. हत्या कोणी आणि का केले हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पोलीस तपास सुरू आहे.