श्रीनगर : काँग्रेसशिवाय सरकार स्थापणार असल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत एकूण ९० जागा आहेत. विधानसभेत बहुमताचा आकडा ४६ आहे. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने ४२ जागा जिंकल्या आहेत. जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या तीन आणि जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सच्या एका सदस्याने नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला आहे. यामुळे ओमर अब्दुल्लांकडे असलेल्या पाठिंब्याची संख्या ४६ झाली आहे. काही अपक्ष आमदारही नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसशिवाय सरकार स्थापन करू शकेल.
ओमर अब्दुल्लांची नेतेपदी निवड
नॅशनल कॉन्फरन्सने ओमर अब्दुल्ला यांची एकमताने पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. लवकरच ओमर अब्दुल्ला नायब राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील.