Thursday, September 05, 2024 09:34:07 AM

Union Budget 2024
लोकसभेत मंगळवारी सादर होणार अर्थसंकल्प

लोकसभेत मंगळवार २३ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे.

लोकसभेत मंगळवारी सादर होणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली : लोकसभेत मंगळवार २३ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण केले जाईल. यंदा लोकसभेच्या निवडणुकीमुळे फेब्रुवारी २०२४ मध्ये लेखानुदान सादर करण्यात आले. आता पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याआधी मंगळवार १६ जुलै २०२४ रोजी अर्थ मंत्रालयात हलवा समारंभ झाला. परंपरेनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सहकाऱ्यांना हलव्याचे वाटप केले. 

हलवा समारंभ ही अर्थ मंत्रालयाची परंपरा आहे. अर्थसंकल्प ही एक गुंतागुंतीची आणि मोठी प्रक्रिया आहे. हे काम पूर्ण झाले की आनंद साजरा करण्यासाठी अर्थ मंत्रालयात हलवा तयार करण्याची परंपरा आहे. 

यंदाचा अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर मंगळवार १६ जुलै रोजी हलवा समारंभ करण्यात आला. आता अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम सुरू झाले आहे. परंपरेनुसार अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सर्व खासदारांना अर्थसंकल्पाची प्रत दिली जाईल. 

सर्वपक्षीय बैठक

संसद भवन अॅनेक्स येथे मुख्य समितीच्या कक्षात रविवार २१ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी ११ वाजता होईल. संसदेचे पावसाळी अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होत आहे. सरकारी कामकाजाच्या आवश्यकतेनुसार हे अधिवेशन १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालेल.


सम्बन्धित सामग्री