Monday, September 16, 2024 01:55:55 PM

National Teacher Award
महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांसह देशभरातील एकूण ८२ शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गुरुवारी गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : शालेय, उच्च आणि कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांसह देशभरातील एकूण ८२ शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गुरुवारी गौरविण्यात आले.
यामध्ये कोल्हापूरचे चित्रकला शिक्षक सागर बागडे, गडचिरोली जिल्ह्यातील मंतैय्या बेडके, पुण्यातील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका प्रा. डॉ. शिल्पागिरी प्रसाद गणपुले, आयआयएसईआर पुणे संस्थेतील प्राध्यापक श्रीनिवास होथा तसेच आयटीआय निदेशक विवेक चांदलिया यांचा समावेश आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, ५० हजार रुपये रोख आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री