Tuesday, July 02, 2024 08:24:51 AM

Ladakh
लडाखमध्ये रणगाडा दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू

लडाखमध्ये दौलत बेग ओल्डी जवळ काराकोरम पर्वतरांगांच्या परिसरात श्लोक नदीच्या पाण्याची पातळी वाढली. यामुळे लष्कराच्या रणगाडा नदीपात्रात अडकला. या दुर्घटनेत पाच जवान हुतात्मा झाले.

लडाखमध्ये रणगाडा दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू

लडाख : लडाखमध्ये दौलत बेग ओल्डी जवळ काराकोरम पर्वतरांगांच्या परिसरात श्लोक नदीच्या पाण्याची पातळी वाढली. यामुळे लष्कराच्या रणगाडा नदीपात्रात अडकला. या दुर्घटनेत पाच जवान हुतात्मा झाले. हुतात्मा झालेल्यांमध्ये एक जेसीओ आहे. तर एका जवानाला वाचवण्यात आले. 

पाण्याची पातळी १६.४ फुटांपर्यंत आली तरी टी - ७२ रणगाडा नदी ओलांडण्यास सक्षम आहे. पण रात्री मुसळधार पावसामुळे श्योक नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढली. परिस्थितीचा अंदाज आला नाही आणि सरावासाठी लष्करी रणगाडा नदीत उतरला. पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे रणगाडा नदीपात्रात अडकला. जवानांना वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे आणि वाढत असलेल्या पाण्याच्या पातळीमुळे रणगाड्यातून बाहेर पडून नदीपात्रात सुरक्षितरित्या बाहेर पडणे कठीण झाले. संकटाची जाणीव होताच लष्कराचे पथक तातडीने मदतीला आले. पण पाण्याच्या प्रवाहामुळे मदतकार्यत अडचणी येत होत्या. एका जवानाला वाचवणे शक्य झाले पण उर्वरित पाच जणांचा मृत्यू झाला. 


सम्बन्धित सामग्री