Tuesday, December 03, 2024 11:14:19 PM

Pakistan
'कारगिलच्या लढाईत पाकिस्तानचा हात'

कारगिलच्या १९९९च्या लढाईत पाकिस्तान हात होता, अशी कबुली पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिली.

कारगिलच्या लढाईत पाकिस्तानचा हात

इस्लामाबाद : कारगिलच्या १९९९च्या लढाईत पाकिस्तान हात होता, अशी कबुली पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिली. संरक्षण दिनानिमित्त रावळपिंडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी ही कबुली दिली. हजारो सैनिक १९४८, १९६५, १९७१, १९९९ या सर्व लढायांमध्ये मारले गेल्याची कबुली लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिली.

पाकिस्तानने पहिल्यांदाच अधिकृतरित्या कारगिलच्या लढाईत हात असल्याची कबुली दिली. पाकिस्तानच्या सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आणि भारताची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. भारताच्या सैनिकांनी दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमामुळे पाकिस्तानची पुरती कोंडी झाली. सर्व लढायांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. या पराभवांची अप्रत्यक्ष कबुली पाकिस्तानने दिली. लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या वक्तव्यावर भारताने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo