Saturday, September 21, 2024 06:47:33 AM

Mumbai
'तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर गुन्हा नोंदवा'

प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे ही फक्त भेसळ नाही तर हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे. यामुळे गुन्हा नोंदवून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होतेय

तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर गुन्हा नोंदवा

मुंबई : जगातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केले. ही घटना उघड झाल्यापासून जगभरातील हिंदू संताप व्यक्त करत आहेत. प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे ही फक्त भेसळ नाही तर हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे. हा प्रकार म्हणजे हिंदूंशी केलेला विश्वासघातच आहे.यामुळे गुन्हा नोंदवून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे. 

माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असतांना तिरुपती बालाजी मंदिराचे पवित्र लाडू बनवण्याचे कंत्राट एका ख्रिस्ती आस्थापनाला देण्यात आले होते, मंदिराच्या विश्वस्तपदी ख्रिस्ती व्यक्तींना नेमले गेले होते, मंदिर परिसरात ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराला प्रोत्साहन दिले गेले आदी अनेक पापे त्या काळात करण्यात आली. त्याचाच पुढचा भाग म्हणजे या प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचले गेले, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट म्हणाले. तिरुपतीचे प्रकरण म्हणजे मंदिर सरकारीकरणाचा सर्वांत मोठा दुष्परिणाम आहे. देशभरातील सर्वच मंदिरांमध्ये अशा प्रकारे धर्मभ्रष्टता वा हिंदु धर्मविरोधी कृती तर होत नाहीत ना, याची तपासणी करण्याची वेळ आली आहे, असेही सुनील घनवट म्हणाले. 

प्रसादाच्या लाडूंमध्ये चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर गुन्हे नोंदवावे. त्यांना अटक करावी; अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केली. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने दादर पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर महासंघाच्या सदस्यांसह अनेक हिंदू उपस्थित होते. 

प्रसादाच्या लाडूच्या प्रकरणाचीच नव्हे, तर जगनमोहन रेड्डी सरकार आणि त्यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपति मंदिराशी निगडीत घेतलेल्या सर्वच निर्णयांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यातील जे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले असतील, ते सर्व तात्काळ रहित करण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने आंध प्रदेश सरकारकडे केली आहे.


सम्बन्धित सामग्री