Friday, June 28, 2024 04:45:15 PM

amravati
अमरावतीत खासदार कार्यालयावरून भांडण

अमरावती जिल्हा मुख्यालयातल खासदार कार्यालयावरून राजकीय नेत्यांमध्ये भांडण झाले.

अमरावतीत खासदार कार्यालयावरून भांडण

अमरावती : अमरावती जिल्हा मुख्यालयातल खासदार कार्यालयावरून राजकीय नेत्यांमध्ये भांडण झाले. या भांडणाची सुरुवात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे झाले. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे नवनीत राणा यांनी खासदार कार्यालय सोडावे नाहीतर त्याचा जबरदस्तीने ताबा घ्यावा लागेल, असा इशारा काँग्रेसकडून यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हा प्रशासनाला दिला. पाटील यांनी सबुरीने घ्या प्रश्न लवकरच सुटेल असे सांगितले. तर तात्पुरती सोय म्हणून पर्यायी कार्यालयातून नवोदीत खासदार वानखेडे यांनी कारभार सुरू करावा, अशी विनंती जिल्हा प्रशासनाने केली. पण पालकमंत्र्यांचे आणि जिल्हा प्रशासनाचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी यशोमती ठाकूर यांनी खासदार कार्यालयाचा ताबा जबरदस्तीने घेणारच असे जाहीर केले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अमरावती लोकसभा मतदारसंघाचा निकाल

बळवंत वानखेडे, काँग्रेस - ५ लाख २६ हजार २७१ मते - एकूण मतांपैकी ४४.८४ टक्के मते
नवनीत राणा, भाजपा - ५ लाख ६ हजार ५४० मते - एकूण मतांपैकी ४३.१६ टक्के मते
निवडणूक निकाल - विजयी उमेदवार - बळवंत वानखेडे, काँग्रेस - १९ हजार ७३१ मतांनी विजय


सम्बन्धित सामग्री