रावळपिंडी : पाकिस्तानच्या सैन्याला बंडाची भीती सतावत आहे. या भीतीतून पाकिस्तानच्या लष्कराने दिलेल्या आदेशांनंतर माजी आयएसआय प्रमुख आणि तीन निवृत्त लष्करी अधिकारी अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे. या चौघांची चौकशी सुरू आहे.
अटकेत असलेले माजी आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हमीद हे इमरान खान यांचे समर्थक समजले जातात. अटकेतील तीन माजी लष्करी अधिकारी हे पण इमरान खान यांचे समर्थक असल्याचे वृत्त आहे. पण या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. अटकेतील लष्करी अधिकाऱ्यांची नावं जाहीर झालेली नाही.