Friday, September 13, 2024 06:57:46 PM

Mumbai
मुंबई विद्यापीठाची बनावट वेबसाईट

मुंबई विद्यापीठाची बनावट वेबसाईट

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच या केंद्राचे बनावट  संकेतस्थळ अर्थात बेवसाईट तयार झाल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. विद्यापीठाने याबाबत तातडीने कार्यवाही केली.  सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थ्यांना या बनावट संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहनही केले आहे.


सम्बन्धित सामग्री