Wednesday, April 09, 2025 09:55:31 PM

पुण्यात बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा पर्दाफाश

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

पुण्यात बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा पर्दाफाश


पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील कोंढवा भागात मोठी कारवाई केली आहे. या भागात बेकायदेशीर पद्धतीने चालवल्या जात असलेल्या ‘बनावट टेलिफोन एक्सचेंज’चा पर्दाफाश करण्यात आला आहे. या ठिकाणावरुन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएसच्या पथकाने तब्बल ३ हजार ७८८ सीमकार्डसह संत सीम बॉक्स, वायफाय आणि सीमबॉक्स चालवण्याकरिता लागणाऱ्या अँटिना तसेच लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे.  


सम्बन्धित सामग्री