Tuesday, July 02, 2024 08:44:23 AM

MLC Election
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेत वाढ

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी वेळेत बदल केला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेत वाढ

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी २६ जून २०२४ रोजी मतदान होत आहे. काही संघटनांनी या मतदानाची वेळ वाढविण्यासाठी केलेली मागणी भारत निवडणूक आयोगाने  मान्य केली आहे. आता मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशी असेल.

या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता बुधवार, २६ जून रोजी मतदान तर सोमवार, १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

विधान परिषद निवडणूक - 

  1. मतदान - बुधवार २६ जून २०२४
  2. मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत
  3. मतमोजणी सोमवार १ जुलै २०२४

भाजपाचे उमेदवार

  1. किरण शेलार - मुंबई पदवीधर
  2. शिवनाथ दराडे - मुंबई शिक्षक
  3. निरंजन डावखरे - कोकण पदवीधर

शिउबाठाचे उमेदवार

  1. अनिल परब - मुंबई पदवीधर
  2. ज. मो. अभ्यंकर - मुंबई शिक्षक

काँग्रेसचे उमेदवार

  1. रमेश कीर - कोकण पदवीधर

सम्बन्धित सामग्री