ठाणे, १८ मे २०२४, प्रतिनिधी : ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील नालेसफाई करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून सफाई कामगारांचे शोषण होत असल्याचे शुक्रवारी उघड झाले. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये नाल्यात उतरून काम करणाऱ्या सफाई कामगारांना कोणतेही सुरक्षा साहित्य दिले नसल्याचे आढळले. गटारातील सांडपाण्यातून कचरा बाहेर काढताना सांडपाणी कर्मचाऱ्यांच्या अंगावर सांडले होते. कामगार नेते जगदीश खैरालिया यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला याबाबत व्हिडीओ आणि फोटो सादर केले.