Sunday, November 24, 2024 09:49:22 PM

G. N. Saibaba
जी. एन. साईबाबाचा मृत्यू, दहा वर्ष होता तुरुंगात

दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक, नक्षलवादी कारवायांमध्ये हात असल्याच्या आरोपात दहा वर्ष तुरुंगात राहिलेल्या आणि सात महिन्यांपूर्वी पुराव्यांअभावी तुरुंगाबाहेर आलेल्या जी. एन. साईबाबाचा मृत्यू

जी एन साईबाबाचा मृत्यू दहा वर्ष होता तुरुंगात

हैदराबाद : दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक, नक्षलवादी कारवायांमध्ये हात असल्याच्या आरोपात दहा वर्ष तुरुंगात राहिलेल्या आणि सात महिन्यांपूर्वी पुराव्यांअभावी तुरुंगाबाहेर आलेल्या जी. एन. साईबाबाचा हैदराबाद येथील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. जी. एन. साईबाबा आजारी होता आणि हैदराबाद येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेत होता. जी. एन. साईबाबा ५७ वर्षांचा होता. त्याचा जन्म १९६७ मध्ये आंध्र प्रदेशमधील अमलापुरममध्ये झाला आणि मृत्यू शनिवार १२ ऑक्टोबर २०२४ रोजी झाला. पित्ताशयाशी संबंधित समस्येवर उपचार करुन घेण्यासाठी जी. एन. साईबाबा हैदराबाद येथील सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. तिथेच त्याचा मृत्यू झाला. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo