मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते वर्सोव्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. संजय पांडेंना बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात काही वर्षांपूर्वी अटक झाली होती. या प्रकरणात त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२२ मध्ये जामीन दिला होता. जामीन मिळाल्यानंतर माध्यमांपासून दूर राहिलेले संजय पांडे काँग्रेस प्रवेशानंतर पुन्हा चर्चेत आले आहेत.