Salary Tripled After Divorce: कोणताही माणस एकटा असताना प्रगती करू शकतो की, लग्न झाल्यानंतर जोडीने जास्त प्रगती होते, हा वादाचा मुद्दा आहे. अनेकांसाठी याची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. अनेकदा करिअर किंवा व्यवसायातील यश यांचा संबंध वैवाहिक आयुष्यातील स्थितीशी जोडला जातो. कधी लग्नानंतर लाभलेल्या जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे करिअर फुलते तर कधी जोडीदारासोबत काही बेबनाव निर्माण झाल्यास त्याचा करिअरलाही फटका बसतो.
या विषयावर कितीही चर्चा केली तरी ती संपणार नाही. मात्र. घटस्फोटानंतर कमाई तिप्पट झाल्याचा अनुभव एका महिलेला आला आहे. व्हीनस वांग असं या महिलेचं नाव असून त्या एका मुलीच्या एकल पालक आहेत. त्या गुगलमधील माजी अधिकारी आहेत. 2020 मध्ये त्यांना त्यांच्या मुलीच्या संगोपनासाठी गुगलमधील नोकरी सोडावी लागली. यानंतर काही कारणांमुळे त्यांना पतीपासून घटस्फोट घ्यावा लागला. व्हीनस 2021 मध्ये घटस्फोटित आणि बेरोजगार होत्या.
हेही वाचा - ‘वंशवादी' म्हटलं iPhone मध्ये टाइप होते ‘ट्रम्प’, तांत्रिक चूक की कुणाचा खोडसाळपणा? अॅपलने काय म्हटलं?
घटस्फोटानंतर व्हीनस यांच्यासमोर अनेक आव्हाने
घटस्फोटानंतर व्हीनस यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. गुगलमधील नोकरी अचानक सोडावी लागल्यानंतर, तंत्रज्ञान क्षेत्रात पुन्हा कारकिर्द घडवण्यासाठी व्हीनस यांनी प्रथम एक स्टार्टअप सुरू करत एआयमध्ये काम केले. व्हीनस यांचे स्वप्न आर्थिक भविष्य पुन्हा उभारण्याचे होते. सततच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे, व्हीनस आज 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 8.7 कोटी रुपये) कमवतात. त्या सध्या एका आघाडीच्या टेक कंपनीच्या एआय विभागात काम करत आहेत.
कोण आहेत व्हीनस वांग?
व्हीनस वांग यांचा जन्म आणि संगोपन मध्य चीनमधील कैफेंग येथे झाले. 2013 मध्ये अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, व्हीनस यांना सिएटलमधील एका टेक कंपनीत पहिली नोकरी मिळाली. त्यानंतर व्हीनस यांनी हार्डवेअर विभागात सोर्सिंग मॅनेजरचे पद मिळाले. पगारही चांगला होता. त्यानंतर, अनेक वर्षे गुगलमध्ये काम केले. 2020 मध्ये वांग यांना गुगलमधील नोकरी सोडावी लागली.
पतीची बदली हे गुगलची नोकरी सोडण्याचे कारण
व्हीनसची गुगलची नोकरी जाण्याचे कारण तिच्या पतीची बदली होती. असे असले तरी, 2020 मध्ये, कोरोना काळात, त्यांनी त्यांच्या मुलीचे संगोपन करण्यासाठी एक वर्षाची रजा घेण्याचा विचार केला होता. पुढच्याच वर्षी त्यांचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीत व्हीनस यांनी घटस्फोटानंतर त्यांच्या बदललेल्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले होते. 'घटस्फोटानंतर एकट्याने आई-वडील दोघांची भूमिका करण्याची एक मोठी जबाबदारी होती,' असे त्या म्हणाल्या.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया - व्हीनस यांचा दावा काही जणांना आश्चर्यचकीत करणारा आणि प्रेरणादायी सुद्धा
दरम्यान व्हीनस वांग यांनी घटस्फोटानंतर पगार तिप्पट वाढल्याचा दावा केल्यानंतर, याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एस युजर म्हणाला की, 'संपत्ती निर्माण करण्यासाठी सकारात्मक आर्थिक सवयी असणे आवश्यक आहे. त्यांना, आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व कळले त्यामुळे 42 व्या वर्षी त्यांची कमाई 9 कोटी रुपये आहे.' दुसऱ्या एक युजरला व्हिनस वांग यांची गोष्ट प्रेरणादायी वाटली. दोन वर्षांत आर्थिक संकटातून करोडपती होण्याचा त्यांचा स्वतःचा प्रवास सांगितला. त्यांनी शिस्त आणि स्मार्ट गुंतवणूक हे आर्थिक यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे घटक असल्याचे अधोरेखित केले.
हेही वाचा - Video Viral: पाकिस्तानी पंतप्रधानांची अजब देहबोली! मूठ आपटून म्हणाले, 'भारताला हरवलं नाही तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही!'