Sunday, June 30, 2024 08:33:17 AM

Election For Speaker of Lok Sabha
लोकसभा सभापती पदासाठी बुधवारी निवडणूक

अठराव्या लोकसभेच्या सभापतीपदासाठी बुधवार २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

लोकसभा सभापती पदासाठी बुधवारी निवडणूक

नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेच्या सभापतीपदासाठी बुधवार २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्ताधारी रालोआकडून ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीकडून के. सुरेश निवडणूक रिंगणात असतील. मतदान सकाळी अकरा वाजता होणार आहे. या निवडणुकीत विजय मिळवल्यास ओम बिर्ला सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी लोकसभेच्या सभापतीपदाची जबाबदारी सांभाळतील. मदाभूसी अनंतसायनम अय्यंगार, डॉ. गुरदयाल सिंग धिल्लन, डॉ. नीलम संजीव रेड्डी, डॉ. बलराम जाखड, गंती मोहन चंद्र बालयोगी यांची सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी लोकसभेच्या सभापतीपदी निवड झाली. पण यापैकी कोणालाही सलग दहा वर्ष सभापती म्हणून काम करता आले नाही. यामुळे बिर्ला यांनी ही कामगिरी केली तर नव्या विक्रमाची नोंद होईल. या विक्रमासाठी ओम बिर्ला यांना दुसऱ्या कार्यकाळातही सलग पाच वर्ष सभापती म्हणून काम करावे लागेल. 

वायनाड लोकसभा मतदारसंघ - राहुल गांधींचा राजीनामा, जागा रिक्त

  1. लोकसभा २०२४
  2. एकूण सदस्य - एक जागा रिक्त असल्यामुळे ५४२ 
  3. रालोआ - २९३
  4. रालोआतील भाजपाची सदस्य संख्या -  २४०
  5. लोकसभेतील बहुमत - २७२
  6. काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी (विरोधक) - २३३

ओम बिर्ला - पहिला कार्यकाळ, १९ जून २०१९ ते ५ जून २०२४

दोन कार्यकाळ असलेले लोकसभा सभापती

  1. जीएमसी बालयोगी - २४ मार्च १९९८ ते १९ ऑक्टोबर १९९९ आणि २२ ऑक्टोबर १९९९ ते ३ मार्च २००२
  2. बलराख जाखड - २२ जानेवारी १९८० ते १५ जानेवारी १९८५ आणि १६ जानेवारी १९८५ ते १८ डिसेंबर १९८९
  3. नीलम संजीव रेड्डी - १७ मार्च १९६७ ते १९ जुलै १९६९ आणि २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७
  4. गुरुदयाल सिंह धिल्लन - ८ ऑगस्ट १९६९ ते १७ मार्च १९७१ आणि २२ मार्च १९७१ ते १ डिसेंबर १९७५
  5. एमए अय्यंगार - ८ मार्च १९५६ ते १० मे १९५७ आणि ११ मे १९५७ ते १६ एप्रिल १९६२

सम्बन्धित सामग्री