Sunday, September 29, 2024 12:30:51 AM

Speaker of the Lok Sabha
चर्चा लोकसभेच्या सभापतीपदाची

अठराव्या लोकसभेच्या सभापतीपदासाठी बुधवार २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

चर्चा लोकसभेच्या सभापतीपदाची

नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेच्या सभापतीपदासाठी बुधवार २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी करत आहेत. सभापती या पदासाठी लोकसभेचे सदस्य मतदान करतात. लोकसभेत मोदी सरकारचे बहुमत आहे. पण २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाचे स्पष्ट बहुमत होते आणि रालोआतील इतर घटक पक्षांमुळे भाजपाची लोकसभेतील बाजू आणखी भक्कम झाली होती. यावेळी भाजपाचे लोकसभेत २४० उमेदवार आहेत. रालोआतील इतर घटक पक्षांच्या मदतीने भाजपाने बहुमत मिळवले आहे. यामुळे फोडाफोडी करून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी विरोधक प्रयत्न करण्याची शक्यता आहे. 

लोकसभेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवणे सत्ताधाऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे. ही निवडणूक जिंकून सत्ताधारी अप्रत्यक्षरित्या बहुमत सिद्ध करतात.  यामुळे मोदी सरकारपुढे सभापतीपदाची निवडणूक होण्याआधी फोडाफोडीच्या शक्यतांना आळा घालणे हे एक मोठे आव्हान असल्याची चर्चा आहे.

वायनाड लोकसभा मतदारसंघ - राहुल गांधींचा राजीनामा, जागा रिक्त

  1. लोकसभा २०२४
  2. एकूण सदस्य - एक जागा रिक्त असल्यामुळे ५४२ 
  3. रालोआ - २९३
  4. रालोआतील भाजपाची सदस्य संख्या -  २४०
  5. लोकसभेतील बहुमत - २७२
  6. काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी (विरोधक) - २३३

सम्बन्धित सामग्री