Saturday, September 28, 2024 02:00:17 PM

Maharashtra Legislative Council Election
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक

विधान परिषदेच्या चार मतदारसंघांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २७ जून रोजी होईल. यानंतर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक

मुंबई : लोकसभेची निवडणूक संपताच विधान परिषदेच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २७ जून रोजी होईल. यानंतर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे. 

विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

  1. २५ जून २०२४ - अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
  2. ०२ जुलै २०२४ - अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
  3. ०३ जुलै २०२४ - अर्जांची छाननी
  4. ०५ जुलै २०२४ - अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
  5. १२ जुलै २०२४ - विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान (मतदानाची वेळ : सकाळी ०९ ते संध्याकाळी ०४)
  6. १२ जुलै २०२४ - मतदान संपल्यानंतर, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार,  १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील. पावसाळी अधिवेशनाआधी बुधवार, २६ जून रोजी विधान परिषदेच्या चार मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. 

विधान परिषद, चार मतदारसंघांसाठी निवडणूक - 

  1. मतदान - बुधवार २६ जून २०२४
  2. मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत
  3. मतमोजणी सोमवार १ जुलै २०२४

भाजपाचे उमेदवार

  1. किरण शेलार - मुंबई पदवीधर
  2. शिवनाथ दराडे - मुंबई शिक्षक
  3. निरंजन डावखरे - कोकण पदवीधर

शिउबाठाचे उमेदवार

  1. अनिल परब - मुंबई पदवीधर
  2. ज. मो. अभ्यंकर - मुंबई शिक्षक

काँग्रेसचे उमेदवार

  1. रमेश कीर - कोकण पदवीधर

सम्बन्धित सामग्री