मुंबई :राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी नागपूर व शिर्डी विमानतळ येथील कामांचे भूमिपूजन आणि राज्यातील नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं.
या कार्यक्रमात मोदींनी जनतेला संबोधित केले. महाराष्ट्रासाठी विविध योजना आणणार आहेत. हरियाणाच्या जनतेचा भाजपावर विश्वास असल्याचे पाहायला मिळाले आहे. डबल इंजिन सरकारच्या काळात वेगवान विकास होत आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याने मराठी माणसांचं स्वप्न पूर्ण झालं असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.