प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमान सातत्याने ४० अंश सेल्सियस व त्यापेक्षा जास्त असल्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक नागरिकांना डोळ्यांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. उन्हामुळे डोळे कोरडे पडून लाल होत आहेत, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे. शहरात ७० खासगी तर दोन शासकीय नेत्र रुग्णालये आहेत. या रुग्णालयांची रोजची ओपीडी २,५५० आहे. यापैकी ५० टक्के म्हणजे सुमारे १ हजार रुग्ण डोळ्यांच्या समस्या घेऊन येत आहेत. त्यामुळे उन्हाचा परिणाम रुग्णांच्या डोळ्यांवर दिसून येत आहे.