Tuesday, July 02, 2024 09:21:02 AM

Dry Day Over
ड्राय डे संपताच दारू खरेदीसाठी झुंबड

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान संपताच मुंबईसह राज्यातील तेरा मतदारसंघांतील ड्राय डे संपला. ड्राय डेचा कालावधी संपताच दारू खरेदीसाठी झुंबड उडाली.

ड्राय डे संपताच दारू खरेदीसाठी झुंबड

मुंबई, २० मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान संपताच मुंबईसह राज्यातील तेरा मतदारसंघांतील ड्राय डे संपला. ड्राय डेचा कालावधी संपताच दारू खरेदीसाठी झुंबड उडाली. नियमानुसार प्रत्येक टप्प्यात ज्या मतदारसंघांमध्ये मतदान असते त्या ठिकाणी मतदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळपासून ते मतदान संपेपर्यंत असा सुमारे ४८ तासांचा ड्राय डे असतो. ड्राय डे असताना दारू विकण्यावर आणि दारू देण्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यावर बंदी असते. याच नियमानुसार पाचव्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील तेरा मतदारसंघांतील ड्राय डे होता. हा ड्राय  डे सोमवार २० मे रोजी मतदान संपताच संपुष्टात आला आणि पुन्हा एकदा दारू खरेदी सुरू झाली आहे.


सम्बन्धित सामग्री