Tuesday, July 02, 2024 09:24:56 AM

Dry Day
निवडणुकीमुळे मुंबई - ठाण्यात 'ड्राय डे'

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील तेरा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामुळे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर तसेच ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात ड्राय डे असणार आहे.

निवडणुकीमुळे मुंबई - ठाण्यात ड्राय डे

मुंबई, १६ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील तेरा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामुळे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर तसेच ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात ड्राय डे असणार आहे. ड्राय डे असलेल्या कालावधीत दारू विकली आणि दिली जाणार नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी असेल. जिथे मतदान होणार आहे त्या तेरा मतदारसंघांमध्ये शनिवार १८ मे ते सोमवार २० मे असे सलग तीन दिवस ड्राय डे असेल. 

  1. शनिवार १८ मे २०२४ - संध्याकाळी पाच वाजल्यापासून ड्राय डे
  2. रविवार १९ मे २०२४ - दिवसभरासाठी ड्राय डे
  3. सोमवार २० मे २०२४ - संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ड्राय डे

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दरवर्षी असलेले ड्राय डे - होळी, दिवाळी, गांधी जयंती, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी

लोकसभा निवडणूक, पाचवा टप्पा - मतदान २० मे २०२४

१ धुळे - सुभाष भामरे, भाजपा विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस विरुद्ध अब्दुर रहमान, वंचित
२ दिंडोरी - भारती पवार, भाजपा विरुद्ध भास्कर भगरे, राशप विरुद्ध गुलाब बर्डे, वंचित
३ नाशिक - हेमंत गोडसे, शिवसेना विरुद्ध राजाभाऊ वाजे, शिउबाठा
४ पालघर - डॉ. हेमंत सावरा, भाजपा विरुद्ध भारती कामडी, शिउबाठा विरुद्ध विजया म्हात्रे, वंचित
५ भिवंडी - कपिल पाटील, भाजपा विरुद्ध सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, राशप विरुद्ध निलेश सांबरे, वंचित
६ कल्याण - डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना विरुद्ध वैशाली दरेकर राणे, शिउबाठा
७ ठाणे - नरेश म्हस्के, शिवसेना विरुद्ध राजन विचारे, शिउबाठा
८ उत्तर मुंबई - पीयूष गोयल, भाजपा विरुद्ध भूषण पाटील, काँग्रेस विरुद्ध बीना सिंह, वंचित
९ उत्तर मध्य मुंबई - अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, भाजपा विरुद्ध वर्षा गायकवाड, काँग्रेस विरुद्ध वारिस पठाण, एमआयएम
१० दक्षिण मुंबई - यामिनी जाधव, शिवसेना विरुद्ध अरविंद सावंत, शिउबाठा
११ दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे, शिवसेना विरुद्ध अनिल देसाई, शिउबाठा विरुद्ध अबुल खान, वंचित
१२ वायव्य मुंबई - रवींद्र वायकर, शिवसेना विरुद्ध अमोल कीर्तीकर, शिउबाठा विरुद्ध संजीव काळकोरी, वंचित
१३ ईशान्य मुंबई - मिहीर कोटेचा, भाजपा विरुद्ध संजय दीना पाटील, शिउबाठा


सम्बन्धित सामग्री