मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान सलग तीन दिवस ड्राय डे असेल. नियमानुसार ड्राय डे असलेल्या कालावधीत दारू विकता आणि देता येत नाही (सर्व्ह करणे) तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी असते. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे राज्यात १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान सलग तीन दिवस ड्राय डे असेल. या व्यतिरिक्त मतमोजणीच्या दिवशीही ड्राय डे असेल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यानचे ड्राय डे
- सोमवार १८ नोव्हेंबर २०२४ - परंपरागत प्रचार थांबणार, संध्याकाळी सहा वाजल्यापासून ड्राय डे
- मंगळवार १९ नोव्हेंबर २०२४ - परंपरागत प्रचार करता येणार नाही, दिवसभरासाठी ड्राय डे
- बुधवार २० नोव्हेंबर २०२४ - मतदान, संध्याकाळी मतदानाचा कालावधी संपेपर्यंत ड्राय डे
- शनिवार २३ नोव्हेंबर २०२४ - मतमोजणी, दिवसभरासाठी ड्राय डे
निवडणूक कालावधी व्यतिरिक्तचे ड्राय डे - नोव्हेंबर २०२४
- शुक्रवार १ नोव्हेंबर २०२४ - दिवाळी, ड्राय डे
- मंगळवार १२ नोव्हेंबर २०२४ - कार्तिकी एकादशी, ड्राय डे
- शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४ - गुरु नानक जयंती, ड्राय डे